किरकोळ कारणावरून सय्यदनगर मध्ये युवकाला जबर मारहाण

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

Sayyadnagar news : मारहाण करून पसार झालेल्यांना वानवडी पोलिसांनी केले 24 तासात अटक

Sayyadnagar news : पोलीस न्यूज 24 : पुणे

हडपसर सय्यदनगर हा अधिकांश भाग मुस्लीम बहुल भाग आहे .

सदरील ठिकाणी पूवी अनेक गुंडांचा वावर होता तो वानवडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी मोडून काडत अनेकांना तडीपार ही केलेत.

सदरील ठिकाणी अनेक घरे ही भाड्याने देलेली असल्याने अनेक घरमालक हे तेथे राहण्यास नसल्याने जे भाडेकरू राहण्यास आलेले आहे त्यात अनेकांवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत ते.

त्यात हि अनेकांनी पोलीस दरबारात नोंदणी केली नसल्याने स्थानिकांची डोके दुखी वाढली आहे.

भांडणे त्यांची त्रास मात्र नागरिकांना भोगावा लागत आहे.

असाच भांडणाचा एक प्रकार ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०७/३० वा च्या सुमारास गल्ली नं २७ ए,सय्यदनगर हडपसर पुणे येथे घडला .

बिलाल शेख, वसीम मोमीन,शाहबाज शेख यांनी पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन साजीद मेहमुद शेख यास शिवीगाळ करत लोखंडी रॉडने ,

लाकडी दांडक्याने डोक्यात ,खांदयावर व हातावर मारहाण मारुन गंभीर जखमी केले.

त्यावेळी मुझाहीद वाहीद शेख ( वय-२० ) हे त्यांना वाचविण्यासाठी गेले असता वसीम मोमीन याने लोखंडी रॉडने मुझाहीद वाहीद शेख यांच्या डोक्यात मारुन जखमी केले.

त्यानंतर त्यांनी मुझाहीद शेख यांच्या घरामध्ये जाऊन त्यांना पुन्हा लोखंडे रॉडने व लाकडी दांडक्याने उजव्या हातावर मारहाण केली.

व घराच्या बाहेर जाऊन मुझाहीद शेख यांच्या काकांना शिवीगाळ करुन,लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन वसीम मोमीन याने म्हंटले कि ,

“तुम हमे बाहर मिलो फिर और मारेंगे” अशी धमकी देऊन ते निघुन गेले.

म्हणुन मुझाहीद वाहीद शेख यांनी त्यांच्या विरुध्द वानवडी पोलिसात तक्रार केली .

आरोपी नामे १)बिलाल जहाँगीर शेख वय-२८ वर्षे रा.गल्ली नं १३ बी,सय्यदनगर हांडेवाडी रोड,हडपसर पुणे मुळ रा.१०७६,एडीकॅम्प चौक,नाना पेठ,पुणे.

२)वसीम चाँदमियाँ मोमीन वय-३७ वर्षे रा.गल्ली नं १३ बी,सय्यदनगर हांडेवाडी रोड,हडपसर पुणे.मुळ रा.फ्लॅट नं १०,एस.एच कंपाऊंड,एस.व्ही रोड जवळ ,वांद्रे वेस्ट मुंबई.

३)शाहबाज महमंद शेख वय-२६ वर्षे रा.गल्ली नं १३ बी,सय्यदनगर हांडेवाडी रोड,हडपसर पुणे.यांच्या विरुद्ध

फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यावरुन भा.द.वी कलम ३२६,३२३,४५२,५०४,५०६,३४. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींना 24 तासात अटक करण्यात आली आहे.

वाचा : रेशन धान्य मिळत नसल्याने विभागीय आयुक्त कार्यालयावर हजारो महिलांचा मोर्चा.

Advertisement
Share Now

2 thoughts on “किरकोळ कारणावरून सय्यदनगर मध्ये युवकाला जबर मारहाण

Comments are closed.