लोणीकंद रस्त्यावर थरार : भर रस्त्यावर गोळ्या घालून खून,

परिसरात दहशतीचे वातावरण.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : लोणीकंद ग्रामपंयायत कार्यालयासमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या तरूणावर दुचाकीवर आलेल्यांनी गोळीबार करत खून केल्याची घटना घडली आहे.

Digital visiting cardcreat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹

यात सचिन नानासाहेब शिंदे वय २९ राहणार लोणीकंद याचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरील घटना आज सकाळी अकराच्या दरम्यान घडली आहे.

शिंदे हा ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर आल्यानंतर एटीएम जवळ सहकार्यां सोबत गप्पा मारत उभा होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या लोकांनी शिंदेवर गोळीबार केला.

सचिन शिंदेंच्या डोक्यात गोळी लागल्याने रक्तबंबाळ होऊन तो खाली पडला. घटनेनंतर आरोपी दुचाकीवरुन पसार झाले.

Advertisement

सचिन शिंदे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे सांगितले जात आहे.त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे.

गोळी लागल्यानंतर तातडीने रुबी हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लोणीकंदमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

आणि बघता बघता बातमी वा-या सारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

मयत सचिन शिंदे हा गोल्डमॅन म्हणून ओळखला जात होता. लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर पुढील तपास करीत आहे.

Advertisement
%d bloggers like this: