पोलीस ठाण्यातच लाच घेताना महिला पोलिसाला एसीबीने रंगेहाथ पकडले.
पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील घटना.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : थेट पोलीस ठाण्यातच लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(ACB) रंगेहाथ पकडलयाने खडबळ उडाली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ५ हजार रुपयांची लाच घेताना श्रद्धा अकोलकर असे पकडण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.
ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्या गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अकोलकर या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन बोत्रे यांच्या रायटर म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान तक्रारदार यांना त्यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्याची पडताळणी करण्यात आली.त्यात आज सापळा कारवाई दरम्यान लाचलुचपत विभागाने श्रद्धा अकोलकर यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.