भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेले असता डोक्यात कोयत्याने वार करून केले जखमी,
वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : लहान भावा सोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मोठ्या,
भावाच्या डोक्यात कोयत्याने वार करून प्राण घेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल,
करण्यात आला आहे.अक्षय चौरे,वय-२५ वर्षे,रा.तरवडे वस्ती, हडपसर यांनी फिर्याद दिली आहे. तर प्रतिक मधुकर कांबळे,
वय-२३ वर्षे,रा. साठेनगर,तरवडे वस्ती,महंमदवाडी रोड,हडपसर, आकाश बाबासाहेब कसबे,वय-२५ वर्ष, रोहीत पोपट थोरात,वय- २१, व इतर एक जणानाला अटक करण्यात आली आहे.
सुमारास फिर्यादी चौरे त्यांचा लहान भाऊ समाधान यांच्या बरोबर यातील आरोपींनी हुज्जत घालुन शिवीगाळ केली होती.
त्याचा जाब विचारण्यासाठी चौरे हे गेले असताना,सदर आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्या डोक्यात कोयत्याने मारुन जखमी केले.
तसेच फिर्यादी चौरे यांच्या बहीणीचे घरात घुसुन तीला व मेव्हणे महेश माने यांनाही शिवीगाळ व हाताने मारहाण करुन त्यांच्या,
घरातील टीव्हि. फ्रीज फोडुन नुकसान करुन केले. व आरोपी व त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादी यांचे रहाते घरी येऊन,
आरडा-ओरडा करुन, हातातील लोखंडी कोयता हवेत फिरवुन
सदर भागात दहशत करुन,तुम्ही पोलीसात तक्रार देऊ नका,
नाहीतर तुम्हाला सोडणार नाही,आम्ही या वस्ती मधील भाई आहे. असे म्हणुन फिर्यादी यांच्या बहीणीचे दिर हे त्यांना घाबरुन घरात,
येत असताना,इतर आरोपींनी त्यांचे हातातील लोखंडी कोयता उजवे हातावर मारुन जखमी केलेले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाडकर करीत आहे.