३ सराईत मोबाईल चोरांना अटक,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offerGOLDEN NIGHT
Advertisement

वानवडी पोलीसांनी ३९ मोबाईल केले जप्त.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे वानवडी पोलीसांकडुन ३ सराईत मोबाईल चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Digital visiting cardcreat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹

वानवडी पोलीस ठाण्यात ५ मोबाईल चोरी गेल्याचा तपास सुरू असताना पोलीस शिपाई नवनाथ खताळ व सुधीर सोनवणे यांना मिळालेल्या बातमीनुसार मोबाईल चोरी करणारा चोरटा हा

रामटेकडी स्मशानभुमी शेजारील मठात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस हवालदार राजु रासगे, अतुल गायकवाड,

संभाजी देविकर, योगेश गायकवाड, महेश कांबळे, नासीर देशमुख यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांचे मार्गदर्शनाखाली अंकुश विठ्ठल कांबळे वय १९ वर्षे रा.सर्वे नंबर १११/३१६, गल्ली नंबर १, महात्मा फुलेनगर वैदवाडी हडपसर पुणे यास सापळा रचुन ताब्यात घेतले. त्याचेकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

Advertisement

तसेच त्याने चोरी केलेल्या मोबाईलांपैकी काही मोबाईल हे आकाश बाळासाहेब बगाडे वय २४ वर्षे रा. सर्वे नंबर ११० ठोंबरे वस्ती रामटेकडी हडपसर पुणे, यास विक्री व्यवहार करण्यासाठी दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तसेच आकाश बगाडे याने त्याचेकडील मोबाईल पैकी काही मोबाईल हे प्रशांत बाळु सुर्यवंशी वय २२ वर्षे रा.सर्वे नंबर १११ /३१६, बुद्ध विहारच्या मागे महात्मा फुलेनगर वैदवाडी हडपसर पुणे, यास विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


३ आरोपींकडुन वानवडी पोलीस ठाणे व पुणे शहर परिसरातुन मोबाईल चोरी केलेली असुन मोबाईल चोरीचे २ गुन्हे उघड करुन एकुण ३९ मोबाईल जप्त केलेले आहेत.

तसेच त्यांचेकडुन लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण यांचेकडील १ दुचाकी व हडपसर पोलीस ठाणेकडील १ दुचाकी गुन्ह्यात वापरलेली १ दुचाकी अशा एकुण ३ दुचाकी मिळुन एकुण ३ लाख २८हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
%d bloggers like this: