पुणे l वानवडी परिसरात १४ वर्षीय मुलीवर बलात्कार
(wanwadi gang rape )7 आरोपी पोलिसांच्या ताब्यात
(wanwadi gang rape ) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
पुण्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
मध्यंतरी दत्तवाडी परिसरात एका २५ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असताना पिंपरी चिंचवडमध्ये देखील अशीच घटना घडली होती .
पुण्यातील वानवडी बजार परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .
या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे .
आरोपी नराधमांनी पीडित मुलीचे रिक्षातून अपहरण केले. पीडित मुलीला वानवडी परिसरात नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला .
या घटनेची माहिती वानवडी पोलिसांना मिळताच 7 आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.
ही घटना रविवारी ( दि .5 ) सायंकाळी वानवडी परिसरात घडली असून ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे .
मिळालेल्या माहितीनुसार , 14 वर्षाची पीडित अल्पवयीन मुलगी एका ठिकाणी थांबली होती .
त्यावेळी आरोपी रिक्षातून आले . त्यांनी मुलीला रिक्षात बसवून एका ठिकाणी घेऊन गेले .
त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला .
या घटनेतील पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली .
ही घटना समजताच वानवडी पोलिसांनी 7 नराधमांना बेड्या ठो कून आत केले आहेत .
आरोपींसोबत त्यांचे इतर साथिदार देखील असल्याचे समोर आले आहे .
आरोपींना न्यायालयात नेण्यात आले असून पोलीस त्यांच्या इतर साथिदारांचा शोध घेत आहेत .
ही घटना अत्यंत संवेदनशील असून याबाबत संपूर्ण कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती दिली जाणार असल्याचे वानवडी पोलिसांकडून सांगण्यात आले.