कोंढव्यात एकमेकांविरोधात जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार,

एकमेकांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरातील उपनगर भागात शुल्क शुल्क कारणांवरून एकमेकांचे जीव घेण्याचे प्रकार घडत आहेत.

creat a new website 4999 ₹Digital visiting cardcreat a new website 9999 ₹

असाच प्रकार कोंढव्यात घडला आहे. साईराज लोणकर, वय-२१, रा. कोंढवा-खुर्द,यांची गाडी पार्क करण्याचे कारणावरुन वाद झाले होते.

त्याचा राग मनात धरुन सदर आरोपींनी त्यांनी गैर-कायदयाची मंडळी जमा करुन, साईराज हे सदर ठिकाणी थांबलेले असताना,

साईराज यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांचे डोक्यात व हातावर पालघनने वार करुन त्यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

तसेच हवेत त्यांचेकडील हत्यारे फिरवुन सदर भागात दहशत निर्माण केल्याने कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चेतन मोरे करीत आहे.

तर बिपीन लोणकर, वय-३०,रा.कोंढवा-खुर्द,यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश बाळासाहेब अडागळे,(वय-३५,रा.नाना पेठ, राजेवाडी)

सतिश अनिल फाळके(वय-२९) अतिश अनिल फाळके (वय-२६) व इतरांना अटक करण्यात आली आहे.

बिपीन लोणकर हे चंद्रशेखर निवास शिवनेरीनगर गल्ली नं. ३६ येथील बिल्ड्डींग जवळील रोडवर हे त्यांचे मामा अतुल कड यांना,

Advertisement

त्यांचे घरी सोडवण्यासाठी मोटार सायकलवर बसुन घेवुन जात असताना यांच्या ओळखीचे यातील आरोपी यांनी संगनमत करून फिर्यादीस शिवीगाळ करून बांबुने मारहाण करुन त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे डोक्यात कोयत्याने मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

फिर्यादी यांचे मामा अतुल कड हे सोडविण्यास आले असता त्यानाही मारहाण केली आहे.त्यानंतर फिर्यादी यांचे भावाचे ओळखीचे मेहबुब बशीर शेख वय-३२,रामहमकदवाडी, पुणे ,

कल्याण सुदामराव गायकवाड, वय-३९, रा.कोंढवा-खुर्द यांनाही बांबुने व हातातील हत्याराने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे करीत आहे.

Advertisement
%d bloggers like this: