१ लाखांपेक्षा जास्त रकमेचे २ गावठी पिस्टल गुन्हे शाखेने केले जप्त,

आरोपीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : शस्त्र जवळ बाळगुन गुन्हे करणारे गुन्हेगारावर विशेष लक्ष ठेवुन त्यांच्याकडून शस्त्रे‌ हस्तगत करावीत असे वरिष्ठांनी आदेशित केलेले होते.

creat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹Digital visiting card

त्या अनुषंगाने दिनांक २५ डिसेंबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, युनिट १ गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस उप-निरीक्षक श्री संजय गायकवाड,

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश भालेकर, अजय थोरात,योगेश जगताप, इम्रान शेख,आय्याज दड्डीकर, शशीकांत दरेकर,तुषार माळवदकर असे गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध होणे कामी,

युनिट-१ चे कार्यक्षेत्रात पेट्रोलींग करीत असताना सेव्हनलव्ह चौक शंकरशेठ रोड पुणे येथे आले असता पोलीस नाईक अमोल पवार व अजय थोरात यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत माहिती मिळाली,

Advertisement

गौरी अपार्टमेंट,३६५/१९ एकबोटे कॉलनी, घोरपडे पेठ, समोर या सार्वजनिक रोडवर पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहीत माने हा उभा असून त्याचेकडे पिस्टल असून तो कोणता तरी मोठ्ठा गुन्हा करण्याचे तयारीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहीत माने हा दिसतास त्यास पकडण्यात आले. रोहित दिलीप माने वय २८ वर्षे रा.५४/एचपी,अंजिक्य मित्र मंडळा जवळ, लोहियानगर पुणे,

असे असून त्याची अंग झडती घेतली असता कमरेला लावलेले व लोड केलेले २ गावठी पिस्टल व ४ जिंवत काडतुसे १ लाख २४ हजार रुपये किंमतीचे अग्नीशस्त्रे मिळुन आल्याने ती जप्त करुन,

आरोपीविरुद्द पोलीस अंमलदार अमोल पवार यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माने विरोधात यापुर्वी खडक व फरासखाना पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न,शस्त्र जवळ बाळगणे,

Advertisement

चोरी असे एकुण ९ गुन्हे दाखल आहे. पुढील कार्यवाहीसाठी खडक पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

%d bloggers like this: