पुणे शहरात दोन चोरीच्या घटना : लाखों रुपये लंपास
Pune city : आंबेगाव बुद्रुक व सदाशिव पेठेत चोऱ्या
Pune city : पोलीस न्यूज 24 : सणासुदीसाठी व काही कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांच्या घरात चोरांनी चोऱ्या करून धुमाकूळ घातला आहे.
रोजच चोऱ्याच्या घटना घडत असल्याने घरात ठेवलेले सोने व पैशांवर चोराकडून डल्ला मारला जात आहे.
यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच घबराट वाढली आहे.अश्याच चोरीच्या दोन घटना पुण्यामध्ये घडल्या आहेत.
पहिली घटना भारती विद्यापीठ येथे घडली आहे.सतिष कमलेकर (वय-४५,रा.आंबेगाव- बुद्रुक )
यांच्या राहता फ्लॅटला कुलुप लावुन बंद असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे राहते घराचे मुख्य दरवाजाचे कुलुप उचकटुन,
त्यावाटे आंत प्रवेश करून,टिव्ही शोकेसवरील कारची चावी घेवुन,उघडया पार्कींग मधील वँगनार कार नं.एमएच १२एनयु ६६९३
ही १ लाख रू किंमतीची चोरी करून बेडरूम मधील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने असा एकुण ४,१५,०००/- रूपये किंमतीचा ऐवज घरफोडी करून नेला.
वाचा: किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाचा खून
तर दुसरी घटना सदाशिव पेठ येथे घडली आहे.
आशुतोष गांधी,(वय-३५ ,रा.सदाशिव पेठ) येथील दिनार अर्पाटमेंन्ट फ्लॅट नं. ५ विजयानगर, सदाशिव पेठ,पुणे
यातील गांधी यांचा राहता फ्लॅट कुलुप लावुन बंद असताना, कोणीतरी चोराने त्यांचे राहते घराचे मुख्य दरवाजाचे कुलुप उचकटुन,
त्यावाटे आंत प्रवेश करून,बेडरूम मधील कपाटातील सोन्या-चांदीच्या वस्तु व रोख रक्कम १,५८,००० असा एकुण ६,३१,०००- रूपये किंमतीचा ऐवज चोरी करून नेला.
याची फिर्याद गांधी यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे.
VIDEO पहा : अप्पर बस डेपो जवळील वस्तीत गुंडांचा हैदोस, वाहनांची केली तोडफोड
Pingback: (social media) एकतर्फी प्रेमातून उकळली १४ हजाराची खंडणी