कसबा पेठेत कोयत्याचा वापर करुन दहशत पसरविणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक,
फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : आजकाल हात तलवारी,कोयते हतात घेऊन दहशत निर्माण करण्याचा नविन फॅड जन्माला आला आहे.
छोटे मोठे भांडणं झाल की तलवारी , कोयते घेऊन स्थानिकांना त्रास दिला जात असल्याने पोलीसांनी कारवाईची कंबर कसली आहे.
फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील हे पोलीस कर्मचाऱ्यांसह हद्दीत पेट्रोलींग करीत असताना कसबा पेठ,
भागातील सराईत गुन्हेगार संकेत आनंद तारु वय १९ वर्षे, रा.१११७ कसबा पेठ, केतन संजय चव्हाण, वय २१ वर्षे, रा. २१३
मंगळवार पेठ, हे त्यांच्या हातामधील कोयते घेवुन स्थानिक नागरीकांमध्ये दहशत निर्माण करत असताना मिळुन आले.
त्यांच्याकडून दोन लोखंडी कोयते जागीच जप्त करुन त्यांचेकडुन भविष्यात होणारे गंभीर स्वरुपाचा गुन्हे घडण्यास प्रतिबंध केला आहे.
सदर आरोपींविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात बेकायदेशीररित्या कोयते बाळगुन स्थानिक नागरींकामध्ये दहशत निर्माण केली म्हणुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फरासखाना पोलीसांनी केलेल्या कामगिरीबद्दल स्थानिक नागरीकांनी सुटकेचा श्वास घेतला असुन त्यांनी पोलीसांच्या कामगिरीबद्दल प्रशंशा करुन समाधान व्यक्त केले आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, डॉ.संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे डॉ. प्रियंका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग,
पुणे गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनखाली राजेंद्र लांडगे, वरिष्ठ
पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस ठाणे,अभिजीत पाटील,सयाजी चव्हाण आकाश दल्मीकी, रिजवान जेनिडी,
सचिन सरपाले,चौधरी, मल्लीकार्जुन स्वामी, मोहन दळवी, ऋषीकेश दिघे, राकेश क्षीरसागर, महंमद हनीफ शौकत
शेख यांच्या पथकाने केली आहे.