वानवडी पोलीस निरीक्षकासहित इतर पोलीस निरीक्षकांच्या बदल्या,
पुण्यातील ४ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे बदलीचे आदेश आज निघाले.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी :४ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. आज अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
वानवडी आणि चंदननगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान,
वानवडीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची कोर्ट कंपनीत नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने अप्पर आयुक्त प्रशासन डॉ.जालिंदर सुपेकर यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत.
१) दिपक माणिकराव लगड गुन्हे शाखा पोलिस आयुक्तांचे वाचक ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक वानवडी पोलीस ठाणे,
२) क्रांतीकुमार तानाजी पाटील वरिष्ठ पोलिस निरीक्षक वानवडी ते कोर्ट आवर.
३) सुनिल धोंडीराम जाधव वाचक, अप्पर आयुक्त पश्चिम विभाग ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंदनगर पोलीस ठाणे.
४) अर्जुन गोविंद बोत्रे पोलिस निरीक्षक (गुन्हे) ते भारती विद्यापीठ पोलीस ठाणे विशेष शाखा, अश्या बदल्या झालेल्या पोलिस निरीक्षकांचे नावे आहेत.