कोंढवा साईबाबा नगर येथील फ्लॅट मध्ये लाखो रुपयांची चोरी,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

कॅश व सोन्याची दागिने गेले चोरीला.(Kondhwa Police Station Pune)

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : बंद फ्लॅट पाहून आजकाल चोरीच्या घटना घडत आहेत. आपल्या शेजारच्या फ्लॅट मध्ये चोरी होत ह्याबद्दल

शेजारी राहणाऱ्यांना सुद्धा कळायच्या आत चोर चोरी करून धूम ठोकत आहेत. असाच प्रकार कोंढवा येथील साईबाबा नगर येथे घडला आहे.

या संदर्भात सिकंदर सैय्यद,वय-४० वर्षे,रा. साईबाबा नगर कोंढवा-खुर्द,पुणे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सय्यद हे त्यांचे फ्लॅट नं.७,हिरा हाईट्स,गल्ली नं.१,साईबाबा नगर कोंढवा-खुर्द फ्लॅटचे आतील व बाहेरील सेफ्टी दरवाजास कुलुप लावुन बंद करून नातेवाईकांकडे गेले असताना,कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे फ्लॅटचे

मुख्य दरवाजाचे कुलुप उचकटुन आंत प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातील तिजोरीच्या कप्प्यातील ६० हजार रूपये रोख व सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख ७५ हजार किमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून नेला आहे.

त्या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए.के.चाऊस करत आहेत.

Advertisement
Share Now