आमदार माधुरी मिसाळ यांच्या घरी लाखो रूपयांची चोरी..!
वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : भारतीय जनता पार्टीच्या पर्वती मतदारसंघाचे आमदार माधुरी मिसाळ यांच्या घरी लाखो रूपयांची,
चोरी झाल्याची घटना घडली असून वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ममता दीपक मिसाळ यांनी फिर्याद दिली आहे.
आमदार माधुरी मिसळ यांच्या घरी काम करणाऱ्या कामगार महिलेने माधुरी मिसाळ यांच्या लहान जाऊच्या बेडरूममधून १८ लाख रुपयांचे दागिने चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी त्या कामगार महिलेचा शोध सुरू केला आहे. आमदार माधुरी मिसाळ व ममता मिसाळ हे एकत्र वानवडी परिसरात राहतात.
दरम्यान मिसाळ यांच्याकडे घर कामासाठी काही महिला आहेत. काही महिला या बेडरूम साफ सफाईचे देखील काम करतात.
ममता यांनी त्यांच्या बेडरूममध्ये दागिने ठेवले होते. लग्नानिमित्त त्यांना त्यातील १४ लाख रुपयांचा हार आणि ४ लाख रुपयांचे कडे परिधान करण्यासाठी हवे होते. यासाठी त्या दागिने आणण्यासाठी गेल्या.
त्यांना बॉक्स मध्ये ठेवलेले दागिने नसल्याचे लक्षात आल्यानंतर यांनी पती व माधुरी मिसाळ यांना या घटनेची माहिती दिली.
त्यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांना मोतीचा हार आणि सोन्याचे कडे असा १८ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.