कचरा वेचण्यास मनाई करताच महिलांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा,
Sell garbage : अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित,
Sell garbage : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
हडपसर इंडस्ट्रियल एरिया कचरा रामटेकडी येथील कचरा गोळा करुन त्यावर उपजिवीका भागवणा-या महीलांना कचरा डेपोमध्ये कचरा भंगार वेचण्यास मनाई केल्याने,
१० ते १५ महिलांनी सदर कचरा डेपोच्या गेटसमोर पुणे कॅन्टोन्मेंट यांचेकडून पाठविण्यात आलेल्या कच-याच्या गाड्या अडवून ओदोलन केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
अचानक पणे महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने अधिका-यांची धांदल उडाली.
वाचा > खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस पोलिसांनी शिताफीने केले अटक
सदरील कचरा डेपोमध्ये १० ते १५ महिला सुमारे ३५ ते ४० वर्षापासून कचरा वेचून आपली उप जिवीका भागवीत आहेत.
परंतू पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने हडपसर इंडस्ट्रियल डेपोमधिल ५० मेट्रीक टन कचरा प्रक्रियेसाठी प्रायोजिक तत्वावर भुमि ग्रिन या खाजगी कंपनीला ठेका दिला आहे.
त्यामुळे सदर महिलांनी आम्हाला कचरा डेपोमध्ये कचरा वेचु द्या,
किंवा पर्यायी काम द्या या मागणीसाठी त्यांनी आज एकत्र येऊन आंदोलन केले.
वाचा > काळेपडळ रेल्वे गेट वरील भुयारी मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा,
नगरसेवक अशोक कांबळे, व आंदोलनकर्ते यांच्या तर्फे तुषार नटवरलाल यांनी महिलांसोबत चर्चा करुन कचरा गाड्या कचरा डेपोमध्ये सोडण्यात आल्या.
सदरील आंदोलन स्थगित करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विधाते, हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड यांनी प्रयत्न केले.
Pingback: (prostitution in lodges) पुणे शहरात लॉजमध्ये चालु असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा,