कोंढव्यातील नगरसेविकेच्या मुलाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

गुन्हे शाखेने केली सचिनला अटक.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : जस्ट डायल नंबरवरुन कोंढव्यातील नगरसेविकेचे मुलाचे मोबाईल नंबर शोधून त्याला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

गुंडाने ठार मारण्याची सुपारी दिली असल्याची धमकी देऊन कोंढवा येथील नगरसेविकेच्या मुलाकडे ४० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने सापळा लावून अटक केली आहे.

सचिन मारुती शिंदे असे अटक केलेल्याचे नाव आहे.याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नंदा लोणकर यांचा मुलगा युवराज लोणकर याला अनोळखी मोबाईलवरून फोन आला तसेच त्याने तुला ठार मारण्याची एका गुंडाने सुपारी दिली आहे.

साडे सहा लाख रुपयांची सुपारी असून ४० हजार रुपयांची खंडणी मागितली.याबाबत युवराज लोणकर यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.

त्याची चौकशी खंडणी विरोधी पथकाने सुरू केल्यानंतर तांत्रिक विश्लेषण केले.त्यावेळी हा फोन सचिन शिंदे याने केला असल्याचे उघडकीस आले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, कर्मचारी पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौन्दर,रवींद्र फुलपगारे, राजेंद्र लांडगे यांच्या पथकाने केली आहे.

Advertisement
Share Now