गुन्हा दाखल झालेल्या पुण्यातील त्या पोलीस निरीक्षकाची अखेर उचलबांगडी,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

समर्थ पोलीस ठाण्यातच दोन गुन्हे दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुण्यातील समर्थ वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश पुराणीक यांची अखेर बदली करण्यात आली आहे.

इंटरेरियर डेकोरेटरला मारहाण करुन कानाला पिस्तुल लावणे, वाहनचालकाला शिवीगाळ करणे असे आरोप पुराणीक यांच्यावर असल्याने’ वादग्रस्त ठरलेल्या पुराणीक यांची बदली झाली आहे.

त्यांचे बदलीची ऑर्डर अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.


घराचे इंटेरियर डेकोरेशनचे काम व्यवस्थित झाले नाही म्हणून राजेश पुराणिक यांनी इंटेरियर डेकोरेटरला कार्यालयात बोलावून तेथे त्याला मारहाण केली व त्याच्या कानाला पिस्तुल लावले होते असा
त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

तसेच दिलेले पैसे परत मागितले होते. याप्रकरणी पुराणिक यांच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तर दुसऱ्या प्रकरणात विश्वास जाधव वय ४८, रा. भवानी पेठ यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. जाधव यांच्या मुलाची वाहन उचल्या प्रकरणी पुराणीक व जाधव यांच्यात वाद झाला होता.

पुराणीक यांनी चिडून जाऊन जाधव यांना शिवीगाळ व दमदाटी करून मोबाईल स्क्रिनचे नुकसान करुन खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राजेश पुराणीक यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पुराणीक यांची बदली करण्यात आली आहे.

Advertisement
Share Now