रेस्क्यू करण्यात आलेली मुलगी कोर्टातून फरार.
मुलीचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याला लाच घेतल्याची घटना ताजीच असताना आज पुन्हा भारती विद्यापीठ पोलीसांकडून रेस्क्यू कारवाईत पकडण्यात आलेल्या मुली पळून गेल्याची घटना घडली आहे.
पोलीस निरीक्षक ( गुन्हे) कोर्टात हजर करण्यासाठी गेल्यानंतर अल्पवयीन मुलगी पीटाच्या कोर्टातून फरार झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात लाच प्रकरण घडल्यानंतर त्याच गुन्ह्यातील मुलींना आज कोर्टात हजर आले होते.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस त्या मुलीचा कसून शोध घेत आहेत.
नोव्हेंबर महिन्यात भारती विद्यापीठ पोलिसांनी वेश्याव्यवसायावर छापा टाकला होता. कात्रज परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत ४ मुलींची दलालांच्या तावडीतून सुटका करण्यात आली होती.
त्यानंतर त्या मुलींना रेस्क्यू होम येथे ठेवण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षकांच्या( गुन्हे) रायटर श्रद्धा अकोलकर यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने अटक केली होती. हा गुन्हा तोच असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान लाच प्रकरण घडल्यानंतर आज स्वतः पोलीस निरीक्षक गुन्हे व कर्मचारी ४ मुलींना घेऊन कोर्टात गेले होते.
त्यावेळी अचानक एक अल्पवयीन मुलगी कोर्टातून फरार झाली. काही वेळातच हे प्रकरण समोर आल्यानंतर मात्र पोलिसांची चांगलीच बोबळी वढाली.
त्या मुलीचा शोध आता घेतला जात आहे. पण अद्याप तरी सापडलेली नाही. ही मुलगी कोल्हापूर येथील असल्याचे सांगण्यात आले आहे.