पोलीस आयुक्तालयातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीसांचा महासंचालकांनी केला गौरव,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, राजेंद्र मोकाशी, क्रांतीकुमार पाटील यांची कामगिरी.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील उत्कृष्ट कामगिरी करणा-या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव पोलीस महासंचालक यांनी केला आहे.


कॉप्स एक्सलन्स हॉल पोलीस आयुक्त कार्यालय पुणे येथे आठवडा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे शहर यांचे संकल्पनेमधून व डॉ.रवींद्र शिसवे, पोलीस सह आयुक्त,अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे बच्चन सिंह,

पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर व सुधाकर यादव, सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रशासन उपस्थितीत होते.

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी गौरविलेल्या अधिकारी व अंमलदार यांना पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

गौरव कार्यक्रमामध्ये पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत या शिर्षकाखाली माहे फेब्रुवारी २०१९, ऑगस्ट २०१९ तसेच सप्टेंबर २०१९ या महिन्यांकरिता,

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील प्रत्येकी १ असे एकूण ३ गुन्ह्यांची निवड केली आहे. सदरचे गुन्ह्यामध्ये एकूण १२ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवून गौरविलेले आहे.

त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी बक्षिसपात्र अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देवून त्यांचा यथोचित सन्मान केला.

            " समानार्थी" 

१. पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण तत्कालीन नेमणूक युनिट ५ गुन्हे शाखा, पुणे शहर व त्यांचे पथकाने कोंढवा पोलीस ठाण्यातील भारतीय हत्यार कायदा गुन्हा उघडकीस आणून, त्यामध्ये एकूण ६ आरोपींना अटक केली.

व त्यांचेकडून पुणे शहर, पुणे ग्रामीण तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरातील दरोडा, दरोडयाचा प्रयत्न, जबरी चोरी, व वाहनचोरी असे एकूण ३७ गुन्हे उघडकीस आणले असुन, एकूण १७ लाख ५५ हजार २१४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.


२) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी युनिट ३ गुन्हे शाखा पुणे शहर व त्यांचे पथकाने कोथरुड पोलीस ठाण्यातील गुन्हेगारी जगतामध्ये कट्टर आणि धोकादायक अशा समजल्या जाणा-या,

शिकलकरी समाजाचे ४ अट्टल गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून एकूण २४ गुन्हे उघडकीस आणून आरोपींची टोळी निष्पन्न केली.

त्यांचेकडून एकूण २३ लाख ३१ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्दमाल हस्तगत केला आहे.


३) वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील वानवडी पोलीस ठाणे त्यांचे पथकाने वानवडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामधील ४ शिकलकरी समाजाच्या आरोपींचा शोध घेण्यासाठी,

विशेष परिश्रम घेवून त्यांचेकडून पुणे शहर व लगतच्या परिसरातील घरफोडी चोरी, वाहनचोरी, जबरी चोरी असे एकूण ५१ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. व एकूण ८८ लाख८८ हजार ८५० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

Advertisement
Share Now