चोरी करणारे गुन्हेगार अखेर वानवडी पोलीसांच्या ताब्यात,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

चोरी करणारे गुन्हेगार अखेर वानवडी पोलीसांच्या ताब्यात

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी- पुणे वानवडी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चेन चोरी प्रकणातील गुन्हेगारांना पकडण्यात वानवडी पोलीसांना यश आले आहे.

Digital visiting cardcreat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹

गुन्हेगार ओमकार मासाळ (वय २१, रा. काळेपडळ), सोन्या उर्फ संजय हरिष भोसले (वय २१, गोधळेनगर),

अनंत मनोज भडकवाड (वय २१, हिंगणे मळा) यांना अटक करण्यात आली असून चेतन ढेबे (रा .सिंहगड रोड) अद्याप फरार आहे.

सदर आरोपींकडून एकूण २,८०,१०० रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये ५ दुचाकी वाहने, १ लोखंडी धारधार

Advertisement

कोयता, १ बॅटरी जप्त करण्यात आली आहे.पोलीस ठाण्यामध्ये नोंद असलेल्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना वानवडी पोलीस

ठाण्यातील तपास पथकातील पोलीस शिपाई नवनाथ खताळ व सुधीर सोनवणे यांना मिळालेल्या बातमीनुसार गुन्हेगार काळेपडळ

भागातील नवीन सासवड रोड स्टेशन या ठिकाणी थांबला आहे असे समजले.वानवडी तपास पथकातील कर्मचारी पोलीस शिपाई नासिर देशमुख,

महेश कांबळे, नवनाथ खताळ, सुधीर सोनवणे, संभाजी देविकर यांनी नियोजनबद्ध सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी ६ गुन्हे केल्याची कबुली दिली.

Advertisement

यामध्ये वानवडी चे २, हडपसर ३ व लोणी काळभोर पोलीस ठाण्यांतर्गत १ गुन्हा उघडीस आला आहे. सदरची कामगिरी सुनील फुलारी अप्पर पोलीस आयुक्त,

सुहास बावचे,पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५, सुनील कलगुटकर, सहायक पोलीस आयुक्त वानवडी,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक. आसाराम शेटे, अंकुश डोंबाळे, पो हवालदार राजू राजगे, आनंद पाटोळे,

पोलीस नाईक संभाजी देविकर, योगेश गायकवाड पोलीस शिपाई नासिर देशमुख, नवनाथ खताळ, सुधीर सोनवणे,अनुप सांगळे महेश कांबळे, सागर जगदाळे यांच्या पथकाने केली .

Advertisement
Advertisement
Share Now

2 thoughts on “चोरी करणारे गुन्हेगार अखेर वानवडी पोलीसांच्या ताब्यात,

Comments are closed.