पूजा चव्हाणच्या प्रकरणात दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

भाजप आणि लीगल जस्टीसचे या दोन्हीं खटले कोर्टात दाखल केले होते.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पूजा चव्हाण प्रकरणात वानवडी पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याने आत्महत्या प्रकरणाची वानवडी पोलिसांनी चौकशी करावी.

त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी दाखल झालेले दोन्ही खटले लष्कर कोर्टाने फेटाळून लावले आहेत.

फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग हे गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम पुरावे नाहीत, असे नमूद करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी पाटील यांनी हे खटले फेटाळले.

भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीच्या अध्यक्षा अॅड. ईशाना जोशी आणि लीगल जस्टिस सोसायटीतर्फे अॅड. भक्ती पांढरे यांनी
खटला दाखल करण्यासाठी अर्ज केले होते.

या प्रकरणात खासगी दावे देखील झाले होते. या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे.

त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. या प्रकरणात कोणाचा हात नाही, असे पोलिसही स्पष्ट करीत नाहीत.

त्यामुळे या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हावा. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा,असे आदेश न्यायालयाने पोलिसांना करावेत, हे दावे दाखल करण्यात आले होते.

परंतु सदरील खटले कोर्टाने फेटाळल्यानंतर आता हे प्रकरण सत्र न्यायालयात घेऊन जाणार असल्याचे ईशाना जोशी यांनी सांगितले आहे.

Advertisement
Share Now