कोट्यावधीच्या वक्फ जमीन मोबदला घोटाळ्यातील आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे विशेष वकील ऍड. समीर शेख यांनी मांडली बाजू.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : आज वक्फ बोर्डाची मालमत्ता विकण्याचा सपाटा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तर काही जागेवर थेट सात बारावर नाव चढवून वक्फ बोर्डाची मालमत्ता भाड्याने देऊन काहिजण आर्थिक गलेलठ्ठ होताना दिसत आहे.

यासाठी आता वक्फ महामंडळाने कंबर कसली असून कारवाईचा सपाटा आता सुरू झाला आहे.हिंजेवाडी माण येथील राजीव गांधी इन्फोटेक साठी अधिग्रहण करण्यात आलेल्या जमीनीच्या मोबदला संदर्भातील गैरव्यवहारातील एक आरोपी चांद रमजान शेख याचा जामीन अर्ज पुणे येथील सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

सुमारे ९ कोटी ६४ लाख रुपये मोबदला मिळणार असलेल्या वक्फ संस्थेचे ट्रस्टी असल्याचे खोटे सांगून तसेच पुराव्या दाखल वक्फ मंडळाचे बनावट ना हरकत पत्र सादर करणाऱ्या इम्तियाज शेख तसेच

चांद मुलाणी या आरोपीं पैकी चांद मुलाणी याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करतांना वक्फ मंडळाला या कामी तक्रार करण्याचा हक्कच नसल्याने जामीन व्हावा असा बचाव घेतला होता.

न्यायालयाने त्याचे म्हणणे फेटाळून लावत सरकारी वकील ऍड. गेहलोत व मूळ फिर्यादी असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे विशेष वकील ऍड. समीर शेख यांचे म्हणणे मान्य करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

सदर घोटाळा हा मोठ्या स्वरूपाचा असल्याची चर्चा असून या मागचे मोठे धेंड बाहेर आले पाहीजे अशी मागणी जनतेतून होत आहे.

Advertisement
Share Now