तहसीलदार यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी २ जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला गुन्हा दाखल,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

खडक पोलिसांनी केली दोघांना अटक.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : हवेली तहसीलदार तृप्ती कोलते- पाटील यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी २ जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार ( anti corruption bureau ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय हिरामण पिंगळे, ३३ वर्षे, रा. देऊळगांवगाडा ता. दौंड जिल्हा पुणे.अमित नवनाथ कांदे वय- २९ वर्षे, रा. कमलविहार, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक ता. हवेली जिल्हा पुणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तृप्ती कोलते पाटील ( trupti kolte Patil ) या हवेली तहसीलदार ( tahsildar) पदावर नेमणुकीस आहेत. १३ सप्टेंबर रोजी त्यांचे शासकीय काम करीत असताना पुणे सोलापूर रोडवर शेवाळवाडी फाटा येथे वाळूने भरलेला ट्रक नंबर एम.एच /१६/टी/४१०० वर अवैध वाळू वाहतुक करताना मिळून आल्याने त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची कार्यवाही सुरू केली.

त्यावेळी सदर वाहन मालकाने तहसीलदारांना लाचेचे प्रलोभन दिले त्यास तहसीलदारांनी स्पष्टपणे नकार दिला तरीसुद्धा त्यांच्या परवानगीशिवाय पिंगळे याने कांदे याला मोबाईलवरून गुगल पेे ( Google pe) अकाऊंटवरून तहसीलदार यांच्या गुगल पे अकाऊंटवर रक्कम जमा करण्यास सांगीतली.

त्याने गुगल पे अकाऊंटवरून तहसीलदार यांच्या गुगल पे अकाऊंटवर प्रथम १ रूपया व नंतर ५० हजार रूपये लाच रक्कम जमा करून लाच देण्याच्या गुन्हयास सहाय्य केले.

रक्कम जमा झाल्याचे लक्षात येताच तहसीलदारांनी तत्काळ संबंधीत पोलीस ठाण्यात त्याबाबत लेखी कळविले तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती.

त्यावरून वर नमुद आरोपींनी लोकसेवकास लाच देण्याचा अपराध केला म्हणून खडक पोलीस ठाण्यात ( Khadak Police Station Pune ) त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे.गुन्हयाचा तपास सहायक पोलीस आयुक्त सीमा आडनाईक ( Seema adNaik) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या करत आहेत.

Advertisement
Share Now