खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात ५ वर्षापासुन फरार असलेल्या गुन्हेगाराला अटक,
युनिट – १ गुन्हे शाखा,पुणे शहर यांचेकडून कारवाई.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात ५ वर्षापासुन फरार असलेल्या गुन्हेगाराला अखेर जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले आहे.
१९ जानेवारी २०१६ रोजी अंबिका नगर चौकातील लॉन्ड्री दुकानासमोर बिबवेवाडी येथे फिर्यादी विकास नवनाथ जठार यांचा ओळखीचा मोन्या विकारे,ओकांर घाटे,राहुल चंदनशिवे,
आकाश गरुड व त्याचे इतर साथिदार यांनी जठार यांच्या पुर्वीच्या वादावरुन हातात कोयते घेऊन सदर भागात दहशत माजुन विकास नवनाथ जठार यांच्या डोक्यात कोयत्याने मारहाण करुन जिवे मारण्याच प्रयत्न होता.
आरोपी मोन्या विकारे,ओकांर घाटे,राहुल,चंदनशिवे,आकाश
गरुड व त्याचे इतर साथिदार यांचेवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यापैकी काही आरोपी दाखल गुन्हयांत अटक करण्यात आले होते. परंतु गुन्ह्यातील आरोपी आकाश गरुड हा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे ५ वर्षापासुन फरार होता.
पोलीस अंमलदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत बातमीनुसार गुन्हयांत ५ वर्षापासुन फरार असलेला आरोपी आकाश गरुड हा स्वारगेट एस.टी.स्टॅन्डवर येणार आहे.
अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्याबाबत वरिष्ठांना माहिती
देत मिळालेल्या माहितीनुसार युनिट-१, गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील स्टाफसह सदरील ठिकाणी जावुन आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव आकाश महिपत गरुड,
वय २९ वर्षे रा.स.नं.७६६,चैत्रबन वसाहत, लेकटाऊनजवळ, बिबवेवाडी , पुणे असे असल्याचे सांगितले.
त्याला तपासासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. सदरील कारवाई युनिट-१, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात,सतीश भालेकर,तुषार माळवदकर यांनी केली आहे.