गोळीबार करुन फरार झालेल्या आरोपीस गुन्हे शाखेने केले जेरबंद,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

कार्तिक संजय इंगवले असे फरार आरोपीचे नाव आहे. ( Uttam Nagar police station)

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : काही दिवसांपूर्वी उत्तमनगर येथे गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने जेरबंद केले आहे.

काही दिवसापुर्वी उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणे गावामध्ये गोळीबार करून फरारी झालेला सराईत गुन्हेगार निलेश गायकवाड याच्या टोळीतील साथीदार कार्तिक इंगवलेे ( Kartik ingawale) हा नाशिक फाटा, पुणे येथे येणार असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती.

सदर ठिकाणी सापळा रचून कार्तिक संजय इंगवले,वय १८ वर्षे, रा. बापुजी बुवा चौक, रामनगर, वारजे माळवाडी पुणे याला ताब्यात घेतले आहे.

त्याच्याकडे माहिती घेतली असता त्याने सांगितले की भांडणाच्या कारणावरून ८ ऑगस्ट रोजी शिवणे स्मशानभुमी जवळ शिवणे येथे त्याच्या साथीदारसह केदार भालशंकर याच्यावार गोळीबार केला असल्याचे सांगितले आहे.

आरोपीस पुढील तपासकामी उत्तमनगर पालीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर इंगवले याच्यावर लोणी काळभोर ( Loni kalbhor ) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न केले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे,सहा पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक

गणेश माने,नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार,ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश टिळेकर, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांचे पथकाने केली आहे.

Advertisement
Share Now