सराईत तडीपार गुन्हेगारास सोलापुर येथुन गुन्हे शाखेकडून जेरबंद,
गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : सहकार नगर येथे खुनाचा प्रयत्न करुन, पुणे येथुन पळुन जाऊन खांडवी गाव, ता. बार्शि, जि.
सोलापुर येथे वेशांतर करुन, एक आरोपी फिरत असल्याची माहिती पोलीस शिपाई गजानन सोनुने व अजित फरांदे यांना प्राप्त झाली.
त्या अनुषंगाने गुन्हयाचे तपासकामी पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे हे युनिट कडील पोलीस पथकासह नमुद आरोपीच्या शोधासाठी खांडवी गांव बार्शी येथे गेले.
आरोपी सुरज ऊर्फ धनंजय अडागळे हा एच.पी. पेट्रोल पंपा समोर, कृष्णप्रकाश हॉटेल जवळ, खांडवी गांव बार्शी येथे थांबलेला दिसला.
त्याला ताब्यात घेऊन त्यास गुन्हे शाखा युनिट-२ पुणे शहर कार्यालयात आणुन दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने त्याचे साथीदारांसह गुन्हा केल्याचे कबुल केले.
आरोपी सुरज नारायण अडागळे याच्यावर पुणे शहरात वेगवेगळया पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, गंभिर दुखापथ, बेकायदेशिपणे अग्नी शस्त्र बाळगणे, तडीपार कालावधीत गुन्हे करणे असे ८ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप युनिट-२ गुन्हे शाखा, पोलीस उप निरीक्षक, आनंदराव पिंगळे, यशवंत आंब्रे,
पोलीस अंमलदार किशोर वग्गु, चंद्रकांत महाजन, गजानन सोनुने, निखील जाधव,अजित फरांदे, समिर पटेल, कादीर शेख, गोपाळ मदने यांनी केली आहे.