एका गुन्हेगाराने धारदार शस्त्राने वार करून पोलीसाचा केला खून,

GOLDEN NIGHTebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

(Policeman samir sayyed) पुणे शहरात उडाली खळबळ आरोपी फरार. (Pune police murder)

(Policeman samir sayyed) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

creat a new website 4999 ₹Digital visiting cardcreat a new website 9999 ₹

पुणे शहर पोलीस दलातील हवालदाराचा खून झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र ठिकाणी खळबळ उडाली आहे.

एका गुन्हेगाराने थेट पोलीसावरच हल्ला करत खून केल्याने पोलीस दलातून रोष व्यक्त केला जात आहे.

फरासखाना पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले समीर जमिल सय्यद वय-४८ वर्षे,रा.रुम नं.६७,खडक पोलीस लाईन,

Advertisement

यांचे मानेवर पोटावर व छातीवर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने वार करुन त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते.

सय्यद यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी तडीपार गुंड असलेला प्रविण महाजन याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

tadipar-criminal-kills-policeman-samir-sayyed
policeman samir sayyed

याबाबत मिळालेली माहीती अशी की, केजळे चौकाजवळील ढमढेरे बोळात जाणारे रोडवरील हॉटेल अहिरचे समोर,

Advertisement

बुधवार पेठ पुणे येथे रात्री बाराच्या सुमारास सय्यद यांच्यावर वार झाला.

पोलीस हवालदार समीर सय्यद हे हॉटेल अहिर समोर फरासखाना पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस होते.

त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती शुक्रवार पेठ पोलीस चौकीचे पोलिस हवालदार जाधव यांना मिळाली.

त्यांनी घटनास्थळी धाव घेताच सय्यद हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.

Advertisement

जाधव यांनी जखमी अवस्थेतील सय्यद यांना घटनेबद्दल विचारले असता त्यांनी पव्या महाजान याने मारले असे सांगितले.

सय्यद यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी सय्यद हे मरण पावले असल्याचे सांगितले.

या संदर्भात श्रीकांत सावंत पोलीस उप-निरीक्षक यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे करीत आहेत.

वाचा :

Advertisement
Advertisement
%d bloggers like this: