पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तडीपार गुन्हेगारास अटक,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement
संग्रहित फोटो

पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तडीपार गुन्हेगारास अटक,

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : गुन्हे शाखा पुणे शहर मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,

creat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹Digital visiting card

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हातुन तडीपार असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज अडागळे, हा रामोशी गेट बसस्टॉप जवळ रस्त्यावर थांबलेला आहे.

त्याचे कमरेला पिस्तुल लावलेले असून तो काही तरी गुन्हा करण्याच्या तयारीत आहे. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक हनुमंत शिंदे व युनिट १,

कडील पोलीस कर्मचारी यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी सापळा रचून बातमीप्रमाणे सुरज ऊर्फ धनंजय नारायण अडागळे वय १९ वर्ष रा महात्मा गांधी सोसायटी , स नं ६५,६३, पदमावती पुणे यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता.

Advertisement


पिस्टल मॅँगझीनसह व एक जिवंत काडतुस असा सर्व मिळून ४०,२००/- रु किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सुरज अडागळे यास दि. १३ डिसेंबर २०१९ पासुन पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातुन १ वर्षासाठी तडीपार करण्यात आलेले होते.

सुरज ऊर्फ धनंजय नारायण अडागळे व त्याचा मित्र महेश ऊर्फ मिट्या नवले, रा. पर्वती दर्शन, पुणे या दोघांविरुध्द समर्थ पोलीस ठाण्यात भारतीय हत्याराचा कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र. पोलीस. कायदा क ३७(१) सह १३५, महा. पो. अधि. कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज अडागळे यास न्यायालयाने दि. २० ऑगस्ट २०२० पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. आरोपीने या पिस्टलचा वापर करुन आणखी काही गुन्हे केले आहेत काय? याचा अधिक तपास चालु आहे.

सुरज ऊर्फ धनंजय नारायण अडागळे याचेविरुध्द यापुर्वी पुणे शहरामध्ये खुनाचा प्रयत्न,प्रयत्न, गंभीर दुखापत, गर्दी मारामारी, अग्निशस्त्र बाळगणे अशा प्रकारचे सहकारनगर, स्वारगेट, दत्तवाडी, कोंढवा पोलीस ठाणे येथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे बच्चन सिंह, यांच्या मार्गदशनाखाली युनिट-१, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस कर्मचारी अमोल पवार, अजय थोरात , वैभव स्वामी, बाबा चव्हाण, अनिल घाडगे तुषार माळवदकर यांनी केली आहे.

Advertisement
Share Now