पुण्यातील सारसबाग जवळील सिटी प्लाझा बार ॲण्ड रेस्ट्रारंट चालकासहित १६ जणांवर गुन्हे दाखल,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

(swargate Police Station) स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

(swargate Police Station) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

कोरोनामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमाला हरताळ फासलया प्रकरणी हॉटेल चालक

व १६ तळीरामा विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा :मैत्रिणीवर बलात्कार करून व्हिडिओ वायरल करणा-या नराधमास अटक

file photo

२१ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हददीत बीट मार्शल गस्त करीत असताना

पाटील प्लाझा परिसरातील हॉटेल चालू असल्याचे निर्दशनास आले,

सदर ठिकाणी जावून खात्री केली असता “सिटी प्लाझा बार ॲण्ड रेस्ट्रारंट” (City plaza bar and restaurant Pune)

हे हॉटेल शासनाने विहीत केलेल्या नियमाचे उल्लघंन करत हॉटेल सुरु असल्याचे दिसून आले,

रेस्ट्रांरटमध्ये गि-हाईकाची सामाजीक अंतर न पाळता मोठया प्रमाणावर गर्दी आढळून आली,

सदर हॉटेल चालकासह इतर १६ जणावर स्वारगेट पोलीस ठाण्यात साथरोग अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच संबधीताना लागलीच ताब्यात घेवून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोहोटे हे करीत आहेत.

वाचा : कोंढवा खुर्द येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन.

Advertisement
Share Now