नवले पुलाजवळील विचित्र अपघातात सात वाहनांचे नुकसान

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

Sinhagad Road News : नवले पुलाजवळील विचित्र अपघातात सात वाहनांचे नुकसान.

sinhagad road car accident today

Sinhagad Road News : Police News 24 : सिग्नलला थांबलेल्या टेम्पोवर मागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने पुढील पाच वाहने एकमेकांवर आदळली.

creat a new website 4999 ₹Digital visiting cardcreat a new website 9999 ₹

या विचित्र अपघातात सातही वाहनांचे 1 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. आज, बुधवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास नन्हे येथील नवले
पुलाजवळ हा विचित्र अपघात घडला.

या प्रकरणी धीरज देविदास लोखंडे (वय 26, सावंत विहार,कात्रज, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

VIDEO पहा : Nawale Bridge जवळील विचित्र अपघातात सात वाहनांचे नुकसान

त्यानुसार ट्रक चालक दशरत राठोड (वय:24 ,रा. सुगुरा, ता. चितापूर , जि . गुलबर्गा, कर्नाटक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

फिर्यादी लोखंडे हे त्यांच्या वडिलांना कारने देहू येथे कामाला सोडण्यासाठी जात होते. नन्हे येथील नवले पुलाजवळ सिग्नल लागल्याने त्यांनी कार थांबविली.

त्यावेळी मागून नॅनो कारने त्यांच्या कारला धडक दिली. लोखंडे यांनी खाली उतरून पाहिले असता ( KA 36 B 2787) या क्रमांकाच्या ट्रकने
पुढे असणाऱ्या टेम्पोला मागून धडक दिल्याने टेम्पो वेगाने पुढे गेला.

Advertisement

त्यामुळे पुढील नॅनो कार, मारुती वॅग्नर, टेम्पो ही वाहने एकमेकांना जाऊन धडकली. या अपघातात पाच वाहनांचे नुकसान झाले.

ट्रक चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून टेम्पोला मागून धडक दिल्याने वरील सर्ववाहने ऐकमेकांवर आदळली

व धडकून या सर्व वाहनांचे किमान 1 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान केल्याने सदर ट्रकचालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या विचित्र अपघातामुळे सकाळी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. सिंहगड रोड वाहतूक विभागाने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

Advertisement

सदरिल प्रकरणाचा पोलीस हवालदार विकास मते पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Share Now

2 thoughts on “नवले पुलाजवळील विचित्र अपघातात सात वाहनांचे नुकसान

Comments are closed.