नागपूर जिल्ह्यातील खाणी परिसरातील घोडेस्वारी अकादमीत घडलेली एक लज्जास्पद व धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 30 वर्षीय तरुणाने घोड्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी छोटा सुंदर खोब्रागडे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना 17 मेच्या रात्री घडली. अकादमीच्या सुरक्षा रक्षकाने एक संशयास्पद व्यक्ती आवारात पाहिल्यानंतर तात्काळ संचालकांना माहिती दिली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपीच्या कृत्याचा संपूर्ण प्रकार समोर आला. या विकृत कृत्यामुळे संपूर्ण परिसरात आणि राज्यभरात खळबळ उडाली आहे.
नागपूर पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर भारतीय दंड विधान आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून, अधिक तपास सुरू आहे.
प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी या अमानवी व विकृत घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. समाजातील मानसिक विकृतीचा कळस गाठणारी ही घटना संपूर्ण मानवतेला हादरवणारी आहे.
