तडीपार गुन्हेगाराकडून दुकानफोडीचा गुन्हा समर्थ पोलिसांनी आणला उघडकीस,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : गुन्हेगारांनी गुन्हे करु नये व हद्दीतून हद्दपार केले तर कधी तरी गुन्हेगार सुधारेल या भावनेतून पोलीस कडक कारवाई करत असतात.

creat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹Digital visiting card

परंतु तडीपार करून ही गुन्हेगार काही गुन्हे कमी करायला तयार नाहीत. असाच एक सराईत तडीपार गुन्हेगाराकडून समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकाने दुकानफोडीचा गुन्हा २४ तासाच्या आत उघड केला आहे.

सुरेश नैनमल ओसवाल, वय-५४ वर्ष, धंदा-व्यापार रा.कल्याण सोसायटी , फ्लॅट नं. ०१, स्वारगेट, पुणे यांचे ८१९ भवानी पेठ, पुणे, सरस्वती सोसायटीचे गाळ्यातील मंगलम ड्रायफ्रुट नावाचे दुकान आहे.

त्यास लोखंडी छोटे शटर आहे. ते शटर उचकटून जैन यांच्या दुकानातील काऊंटरचे कॅश ड्रॉवरमधील एकुण रोख रक्कम रुपये ४८ हजार १०० रुपये चोरुन घेवून गेले होते.

Advertisement

तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक विशाल मोहिते, सुशील लोणकर, संतोष काळे,हेमंत पेरणे, दत्ता सोनवणे यांनी तांत्रिक बाबी पडताळून यातील अज्ञात आरोपीला अटक केली आहे.

खडक पोलीस ठाण्याचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पाटोळे, रा.अंजुमन मज्जीदच्या मागे, कासेवाडी भवानी पेठ, पुणे याने केल्याचे प्राथमिक तपासावरुन निष्पन्न झाले.

मोहिते व तपास पथकातील पोलीस शिपाई सुमित खुट्टे व निलेश साबळे हे सदर आरोपीचा शोध घेत असताना त्यांना मिळून आला त्यामुळे ताब्यात घेण्यात आले.

आकाश उर्फ झुरळया विदठ्ठल हा खडक पोलीस ठाणेतील रकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यास २ वर्षाकरीता पुणे पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून तडीपार केले,

Advertisement

असताना देखील सदर आदेशाचा भंग करून मिळून आला म्हणून त्याला अटक करण्यात आली आहे.

आकाशकडे विचारपूस केली असता मंगलम ड्रायफ्रुट नावाचे दुकानातून काऊंटरचे कॅश ड्रॉवरमधील रक्कम चोरी केलेबातची कबूली दिली आहे.

त्याच्याकडून गुन्हयातील चोरी केलेली रक्कम रु ४०हजार पंचनाम्याने जप्त करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Share Now