सराईत तडीपार गुन्हेगाराकडून रिव्हॉल्व्हर व काडतुसे जप्त,

(Tadipar criminals) भारती विद्यापीठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

(Tadipar criminals) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी :

creat a new website 9999 ₹Digital visiting cardcreat a new website 4999 ₹

कोयता घेऊन दहशत निर्माण करणा-या तडीपार गुंडास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडू रिव्हॉल्व्हर व ४ काडतूसे जप्त केले आहे.

भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी नितीन शिंदे व तपास पथकातील पोलीस अंमलदार हददीत गुन्हेगारांवर प्रतिबंध करणेसाठी पेट्रोलिंग करत असताना,

शनिनगर कात्रज, पुणे येथे एक इसम हाता मध्ये पालगन घेऊन मोठमोठयाने आरडाओरडा करुन दहशत निर्माण करीत फिरत असल्याने तेथील दुकानदार हे आपली दुकाने बंद करीत आहेत.

Advertisement
tadipar-criminal-arrested-by-crime-branch
संग्रहित छायाचित्र

अशी बातमी पोलीस कर्मचारी सर्फराज देशमुख व गणेश शेंडे यांना खास बातमीदारा मार्फतीने खात्रीशीर माहीती मिळाल्याने सदरची माहीती वरिष्ठांना दिली.

सदरील ठिकाणी जावुन सापळा लावला. शनिनगर पसिरामध्ये गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला संशयास्पद रित्या हातामध्ये पालगन घेऊन ,

हर्षदा सुपर मार्केट दुकानाजवळ भाईगिरी करताना दिसला. पोलीसांना पाहून पळुन जावु लागला.

त्याचा पाठलाग करत त्याला पकडून नाव विचारलं असता कृष्णा बबन लोखंडे,

Advertisement

वय १९ वर्ष रा शनिनगर, साई मंदिरासमोर आंबेगाव पुणे असे असल्याचे सांगितले.

वाचा : मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी,

त्याचे हातामधील एक लोखंडी पालगन होती व त्याची अंगझडतीत घेतली त्याच्या पॅन्टच्या आत खोचलेले एक पिस्टल मिळुन आले.

तसेच पॅन्टच्या डाव्या खिशात चार जिवंत काडतुस मिळुन आले.

Advertisement

लोखंडे हा तडीपार असताना शहरात फिरून दहशत निर्माण करत होता.

वाचा :हडपसर येथील शफी इनामदार विरोधात वानवडी पोलिसात आणखीन एक F I R दाखल,

%d bloggers like this: