पुण्यातील महिला कर्मचाऱ्याची लाचेची अजब मागणी, उडाली खळबळ.
१ गुंठा जमीन व २० हजारांची केली मागणी.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरातील एका शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने लाचेचया बदल्यात १ गुंठा
जागा व २० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी सदरील महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
पुणे हवेली येथील रेकॉर्ड रूम मधील भोसले मॅडम नावाच्या महिले कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महिला कर्मचारी हवेली तहसील रेकॉर्डरूम येथे नोकरीस आहे.
दरम्यान यातील तक्रारदार यांना काही कागदपत्रे हवी होती. यामुळे त्यांनी रीतसर अर्ज केला होता.
पण त्यावर महिला कर्मचारी भोसले मॅडम यांनी तक्रारदार यांच्याकडे १ गुंठा जागा आणि २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यानुसार या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आज सापळा लावला व कारवाईत लाचलुचपत विभागाने भोसले यांना २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.