पुण्यातील महिला पोलीसाला ५०० रूपयांचा दंड,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

विना मास्क कारवाई करताना एका नागरिकाने केले होते विडिओ टि्वट.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : कोरोना संसर्ग वाढता वाढता वाढत चालल्याने शासकीय यंत्रणेवर मोठया प्रमाणावर ताण आला आहे.

creat a new website 4999 ₹Digital visiting cardcreat a new website 9999 ₹

तर विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. परंतु वाहतूक पोलीस कारवाई करताना स्वतःच नियम धाब्यावर बसवत विना मास्क कारवाई करताना दिसून येत आहे.

विना मास्क कारवाई करणा-या महिला वाहतूक (traffic) पोलीसाला चांगलेच महागात पडले आहे.

विश्रांतवाडी वाहतूक पोलीस विभागाकडून कारवाई सुरू असताना एका नागरिकाला अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला मात्र दंड वसूलीचया नादात महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तोंडाला मास्क लावलेले नव्हते.

Advertisement

यावेळी सदरील सजग नागरिकाने विडिओ काढत महिला पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना विडिओ दाखवला परंतु वरिष्ठांनी दाद न दिल्याने तो विडिओ मुख्यमंत्री, पुणे पोलीस आयुक्त, पुणे महानगर पालिका आयुक्त, तत्कालीन गृहमंत्र्यांना टि्वट करत कारवाईची मागणी केली होती.

त्या टि्वटची दखल घेत अखेर विना मास्क कारवाई करणा-या महिला कर्मचारी वंदना संजय आल्हाट यांच्याकडून ५०० रूपये दंड वसूल करण्यात आल्याने पोलीसांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

Advertisement
Advertisement
Share Now