नारायण राणे यांना लवकरच होणार अटक ?

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

चतु:शुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) यांच्याविरोधात चतु:शुंगी पोलीस ठाण्यात ( chaturshringi police station ) गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.

पुणे पोलिसांचे पथक राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणला ( Chiplun) रवाना झाले आहे.

पोलीस पथकात दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. याप्रकरणी शिवसेनेचे पुणे युवा सरचिटणीस रोहित रमेश कदम रा. पाषाण यांनी तक्रार दिली आहे.

सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती.याप्रकरणी शिवसेना युवासेनेचे सरचिटणीस रोहित कदम ( Rohit kadam) यांनी त्यासंदर्भात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून सोमवारी रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत चर्चा केली होती.

यानंतर पुणे पोलिसांचे एक पथक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झाले आहेत.

Advertisement
Share Now