पुणे पोलीसांची धडाकेबाज कारवाई : १२० कोटींचा गुटखा जप्त,
अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे गोटात अस्वस्थता.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : महाराष्ट्र गुटखा बंदी असतानाही आज सर्वांच्या आशिर्वादाने राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे.
पोलीसांकडून कारवाई होत असल्यातरी दुसऱ्या दिवशी लगेचच जामिनावर सुटका होत असल्याने कारवाईची भिती कमीत चाललेली आहे.
तरीही पोलीसांचा कारवाईचा रेटा चालू असल्याने गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखने कर्नाटक शहरात जाऊन एका विमल उत्पादन करणाऱ्या कंपनीवर कारवाई केली आहे.
कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर मनोज श्रीवास्तव याला ताब्यात घेतले होते. परंतु मनोज यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने पुण्यात आणले जाणार आहे.पुण्यात एक गुटखा कारवाई करून त्याच कारवाईला धरून तबल २८ ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली आहे. यात जवळपास आतापर्यंत १८ जणांना अटक केली आहे.
तर कोट्यवधी रुपयांचा गुटखा देखील जप्त केला गेला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी छापा कारवाईसाठी वेगवेगळी पथके तयार करुन १८ जानेवारी रोजी सकाळी स्थानिक पोलीसांची मदत प्राप्त होताच.
त्यांच्या मदतीने अंतरसनाहल्ली इंडस्ट्रियल एरिया तुमकुर, कर्नाटकस्थित महाराष्ट्रात प्रतिबंधीत असणारा विमल गुटखा व व्ही-१ तंबाखु उत्पादन साठवणुक करणा-या सर्व ठिकाणांवरती पथकाने पंचासह छापा टाकला,
सदरील ठिकाणांवरती एकुण १२० कोटी रुपयाचा विमल गुटखा, त्यासाठी लागणारा कच्चा माल त्यामध्ये सुपारी, सुगंधीत द्रव्य कथ्था, चुना, मशीनरी तसेच व्ही-१ तंबाखु व ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल त्या मध्ये तंबाखु, सुगंधीत द्रव्य, मशीनरी मिळुन आले.
गुटखा पुरवठा करणा-या कंपनीवर केलेली छापा कारवाई ही सदर अवैध उद्योगांवरील आजपावेतोची सर्वात मोठी छापा कारवाई आहे.