गजा मारणेची आला रे आला तुमचा बाप आला अशी व्हिडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या विरोधात एमपीडीए( MPDA) दाखल,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

१० महिन्याच्या कालावधी मध्ये ३६ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये जेरबंद.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कारागृहातून बाहेर पडल्यावर आला रे आला तुमचा बाप आला अशी गजानन मारणेची व्हिडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या विरोधात पोलीसांनी एमपीडीए दाखल केला आहे.

अट्टल गुन्हेगार संतोष पांडुरंग तोंडे,वय-३८ रा.सुर्यतेज जिम शेजारी सुतारदरा, कोथरुड सध्या रा. मु.पो. खेचरे,ता. मुळशी,जि.पुणे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

त्याने त्याचे साथीदारांसह कोथरुड, हडपसर तळेगांव दाभाडे पोलीस
ठाणे, पुणे. हद्दीत दुखापत, दरोडा तयारी, दंगा, खंडणी, वाहनांची तोडफोड, जबरी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.

मागील १५ वर्षामध्ये. त्याचेविरूध्द एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परीसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती.गजानन मारणे हा तळोजा कारागृहा येथुन बाहेर आल्यानंतर संतोष तोंडे याने इतर साथीदारांसह चारचाकी वाहनांसह एकत्रीत तळोजा कारागृह येथुन गजा मारणे याच्या २०० ते ३०० इतर समर्थकांसह चारचाकी वाहनाने मुंबई ते पुणे हायवेवर रस्ता ब्लॉक करत कोणताही टोल न भरता कायद्याचे उल्लंघन करत रॅली काढली होती.

सदर प्रवासादरम्यान त्याने व गजानन मारणे यांच्या इतर समर्थकांनी मुळशी पॅटर्न चित्रपटामधील डायलॉगची क्लिप तयार करुन “आला रे आला,तुमचा बाप आला” अशा क्लिप व्हायरल करुन जनतेत दहशत निर्माण केली होती.

तो पुणे शहरातील कोथरुड,हडपसर, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे रहिवासी लोकांच्या आणि व्यवसाय चालविणा-या व्यावसायिकांच्या जीवीतास आणि मालमत्तेस धोका बनलेला होता.

वेळ प्रसंगी तो दमदाटी, मारहाण करुन शस्त्राचा धाक दाखवुन खंडणी व जबरी चो-या करत होता.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे (तत्कालीन) व महेंद्र जगताप कोथरुड पोलीस ठाणे यांनी एमपीडीए कायदयान्वये नमूद गुन्हेगारास स्थानबध्द करण्याकामी प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता.

पोलीस आयुक्तांनी प्रस्तावाची पडताळणी करुन नमुद गुन्हेगाराविरुध्द १५ सप्टेंबरला एमपीडीए कायदयान्वये १ वर्षाकरीता स्थानबध्दचे आदेश पारीत केले आहे. अमिताभ गुप्ता यांनी सक्रिय व दहशत निर्माण करणा-या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

त्यानुसार मागील १० महिन्याच्या कालावधी मध्ये ३६ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल
गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी या प्रमाणे कारवाई करण्याचे ठरविले असल्याचे पोलिसांकडून कळविण्यात आले आहे.

Advertisement
Share Now