५ लाख २९ हजारांचे ५२ ग्रॅम ९८० मिलीग्रॅम कोकेन अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याला पोलीसांकडून अटक,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : आज १६ जून रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा येथे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार योगेश मोहिते यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली

की कोंढवा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ऊंड्री पुणे येथील भक्ती प्राईड सोसायटी फ्लॅट नंबर १०२, वडाचीवाडी रोड पुणे या ठिकाणी एक परदेशी नागरिक राहत असुन तो घरातुन चोरून कोकेन ड्रग्जची विक्री करत आहेत.

त्यांनी लागलीच सदरची बातमी विनायक गायकवाड पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा यांना कळविली असता त्यांनी तात्काळ वरिष्ठांना कळवुन सदर बाबत कायदेशिर बाबीची पुर्तता करुन ते स्वत कर्मचाऱ्यांसह ऊंड्री पुणे येथील भक्ती प्राईड सोसायटी फ्लॅट नंबर १०२ वर जावुन छापा टाकला असता,

त्या कारवाई मध्ये इसम ओलमाईड क्रिस्तोफर कायोदे (OLMIDE CHRISTOPHER KAYODE ),वय-४२ वर्षे सध्या रा. भक्ती प्राईड सोसायटी, फ्लॅट नंबर १०२, वडाचीवाडी रोड,उंड्री पुणे मुळ रा.नायजेरिया लगोसे हा बेकायदेशीररित्या त्याचे कब्जात

विक्रीसाठी ५२ ग्रॅम ९८० मिलीग्रॅम कोकेन ५ लाख २९ हजार ८०० व तीन मोबाईल फोन ६ हजार इलेक्ट्रॉनिक वजन कटा असा एकुण ५, लाख ३६ हजार ८००‌ रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

त्याच्य विरोधातत कोंढवा पोलीस ठाण्यातील हवालदार पांडुरंग पवार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कामगिरी पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस अंमलदार, प्रविण शिर्के, सुजित वाडेकर, संदिप जाधव, राहुल जोशी, विशाल शिंदे, विशाल दळवी,मारुती पारधी,

प्रविण उत्तेकर, मनोज सुळुके, नितीन जाधव, पांडुरंग पवार, संदेश काकडे, योगेश मोहिते, रुबी अब्राहम, रेहना शेख, यांनी केली आहे.

Advertisement
Share Now