कोंढव्यातील एएसके फंक्शन हॉलच्या मालका विरोधात पुणे महानगरपालिकेने केला गुन्हा दाखल,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

लाखो रूपयांचे टॅक्स न भरल्याने मनपाने केले होते सिल.

मनपाने दिली एफआयआरची प्रत तर एसीपींकडून देण्यास टाळाटाळ. ( Kondhwa police station news)

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुणे शहरातील उपनगर परिसरात अनेक ठिकाणी लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांसाठी फंक्शन हॉल ( function hall ) सुरू आहे . त्या फंक्शन हॉलला बांधकाम विभागाची परवानगी तर नाहीच नाही, परंतु महानगर पालिकेने लावलेले कर देखील भरले जात नसल्याचे सजग नागरिक टाईम्सने ( sajag nagrik Times ) उघडकीस आणले होते.

त्यानुसार बऱ्याच फंक्शन हॉलला मनपाकडून नोटीसा बजावण्यात आले होते. त्यात ८० लाखांपेक्षा जास्त थकीत कराची रक्कम एएसके फंक्शन ( ASK function hall Kondhwa ) हॉलला कर भरण्याचे सुचित केले होते. त्यात एसके फंक्शन हॉलचे मालक आरिफ समद खान यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असता पुणे मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदरील सर्वे नंबर ५१ मिठानगर नवाजिश पार्क येथील एसके फंक्शन हॉलच्या मिळकतीला ताळे ठोकून सिल केले होते.

आरिफ खान यांनी ते मनपाची परवानगी ( pune PMC ) न घेता व कर न भरता थेट सिल तोडून आत प्रवेश केला होता. त्या संदर्भात मनपाकडून कोंढवा पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता.

परंतु कोंढवा पोलिसांनी त्या पत्राकडे दुर्लक्ष करून ५ महिने गुन्हा दाखल केला नव्हता, गुन्हा का दाखल झाला नाही याची माहिती सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्याकडे माहिती अधिकारात मागितली होती.

तर तीच माहिती कर आकारणी कर संकलन विभागाकडे देखील मागितली होती. त्यामुळे कोंढवा पोलीस ठाण्यातील यंत्रणा खडबडून जागे होत एएसके फंक्शन हॉलच्या मालकाला ताब्यात घेऊन आरिफ समद खान व त्यांच्या पत्नी विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे मनपा तर्फे विभागीय निरिक्षक कर आकारणी कर विभागातील राजेश वाघचौरे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती अधिकार टाकण्यापूर्वी यंत्रणा झोपली होती का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांपुढे उपस्थित होत आहे.

माहिती अधिकारात माहिती मागितली नसती तर कदाचित गुन्हा दाखल झालाच नसता? असे कित्येक प्रकरणे असतील जे धूळखात पडली असेल? गुन्हा तर दाखल करण्यात आला आहे परंतु आजही मिळकतीचे कर न भरता ऐ.स.के फंक्शन हॉल सुरूच आहे.

या बाबतीत कर आकारणी कर संकलन विभागाकडे माहिती घेतली असता पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल असे सांगितले आहे.

……………..चौकट……………

१ कोट २ लाख १६ हजार रुपये आजही मिळकतीचे कर थकीत असताना आजूनही सदरील मिळकत सिल करण्यात आलेली नाही. त्यामुळे एएसके फंक्शन हॉल बिनधास्त पणे भाड्याने दिले जात आहे. तरी जो पर्यंत थकीत कर पुर्णपणे वसुल केला जात नाही तो पर्यंत सदरील मिळकतीला ताळे ठोकून सिल करण्यातची होत आहे.

…………..चौकट…………

कोंढव्यातील फंक्शन हॉलचे थकीत कर..

पारगे नगर येथील सिटी लॉन्सचे ३७ लाख १५ हजार, ओमकार गार्डन ८ लाख ५८३, वेलकम हॉल ३२ लाख १९ हजार २१०, फाईव्ह स्टार हॉल ९ लाख १५ हजार ४२६ , अशी थकबाकीदारांची नावे असून त्यांच्यावर कार्यवाही कधी करणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

Advertisement
Share Now