पुण्यातील उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यास लाच घेताना पकडले,

देशी दारूच्या दुकानातच पैसे घेताना रंगेहाथ पकडलं.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : लॉकडाउनच्या काळात ही हप्ते वसूली करणा-या अधिका-यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संक्रांत आणली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाईया मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
पुणे शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याला ७ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
ही कारवाई वानवडी परिसरात झाली आहे. आनंदा काजळे असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
काजळे हे वानवडी विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरीस आहेत.
यादरम्यान लॉकडाऊन काळातला हप्ता न दिल्याने त्यांनी तक्रारदार यांना हप्ता देण्याची मागणी केली.
याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आज वानवडी भागातील एका देशी दारूच्या दुकानात ७ हजार रुपयांची लाच घेताना आनंदा काजळे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.