कार चालवताना सीट बेल्ट न लावल्याने कारवाई करना-या पोलिसाला मारहाण,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : चारचाकी वाहन चालविताना सिट बेल्ट न लावल्याने कारवाई करत असलेल्या वाहतूक पोलीसासोबत हुज्जत घातल्या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

creat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹Digital visiting card

पोलीस नाईक दयानंद गायकवाड, ( मुंढवा वाहतुक विभाग ) पुणे शहर यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून सनी तानाजी शिंदे (वय-२५ वर्षे,रा. आशिर्वाद निवास,वडगाव – शिंदे पुणे ) याला अटक करण्यात आली आहे.

गायकवाड हे मुंढवा चौकात वाहतुक नियमनाचे काम करत असताना अटक आरोपीने कार मध्ये बसताना सीट बेल्ट

Advertisement

लावला नसल्याने त्याच्यावर सिट बेल्टची कारवाई करीत होते. कारवाई करताना आरोपी ने फिर्यादी बरोबर हुज्जत घालुन त्यांना अपशब्द वापरून त्यांना दमदाटी करुन धमकी दिली आहे.

तसेच फिर्यादी यांना धक्का -बुक्की करून ते करीत असलेल्या शासकीय कर्तव्या मध्ये अडथळा निर्माण केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काटे करत आहे.

Advertisement
Share Now