अवैध गुटखा विक्री करणाऱ्या २९ जणांवर पोलिसांकडून कारवाई,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

creat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹Digital visiting card

हडपसर, कोंढवा,वानवडी, फरासखाना, खडकी, विमानतळ, कोथरुड वारजे, उत्तमनगर या पोलीस ठाण्याच्या हददीत कारवाई.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात गुटखा व सुगंधी पानमसाला पदार्थावर बंदी असूनही राजरोसपणे विक्री सुरू आहे.

तसेच पुणे शहरातील अनेक ठिकाणी गुटखा विक्री सुरू असल्याने पोलीसांच्या कारवाईया सुरू आहे. परंतु अटक झाल्यानंतर,

Advertisement

जामिनावर सुटका झाल्यावर परत गुटखा विक्रेते सक्रीय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तरी पोलिसांचा कारवाईचा,

रेटा सुरूच असून पुणे शहरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या २९ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

३ नोव्हेंबरला शहरातील हडपसर, कोंढवा,वानवडी, फरासखाना, खडकी, विमानतळ, कोथरुड वारजे, उत्तमनगर या पोलीस ,

ठाण्याच्या हददीत अवैध रित्या गुटखा विक्री व वाहतुक होत असल्याबाबत माहिती मिळाल्यावरुन पुन्हा पोलीस अधिकारी व,

Advertisement

पोलीस अमंलदार यांची ३३ पथके स्थापन करुन वरील पोलीस ठाण्याच्या हददीत छापे टाकून २३ गुन्हे दाखल करण्यात आले,

असून २९ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचेकडुन १२ लाख २६ हजार ४६३ किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

Advertisement
Share Now