३१ डिसेंबरला ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई करताना पोलिसांनी काळजी घ्यावी : अजहर खान
नोजलच्या वापरा मुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता?
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : ३१ डिसेंबरची आतुरतेने वाट पाहत असलेले पुणेकरांचा आनंदाचा क्षण आज आला आहे. त्यात काही,
जण घरी राहुन नविन वर्षाचे स्वागत करतात तर काही जण रस्त्यावर उतरून. नविन वर्षाच्या स्वागतासाठी काही जण दारु,
पिऊन आनंद साजरा करताना दिसतात. दारू पिऊन वाहन दाटताना अपघातही होतात. ते रोखण्यासाठी पोलिस कारवाई,
करतात. दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या विरोधात दर वर्षी प्रमाणे यंदाही ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई पुणे पोलिसांकडून होणारआहे.
परंतु यंदा कोरोना महामारीने थैमान घातले असले तरी अद्यापही कोरोना संपलेला नाही. ड्रिंक अँड ड्राइव्हच्या कारवाई करताना,
पोलिसांनी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण पोलीस कारवाई करताना एखाद्याने दारू पिली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी,
तोंडात नोजल घालून पाहणी करतात तोच नोजल दुसऱ्या व्यक्तीच्याही तोंडात घालून तपासतात तर काही ठिकाणी पोलीस,
तोंडाची वास घेऊन दारू पिली आहे की नाही याचा अंदाजा घेताना दिसतात त्यामुळे कोरोना संक्रमण रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई करताना पोलीसांनी दक्षता, सावधानता बाळगावी असे सजग नागरिक टाईम्सचे कार्यकारी संपादक अजहर खान यांनी पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.