पोलिसांनी अटक केलेल्या गुन्हेगारांकडून हस्तगत केले ३३ मोबाईल हँडसेट,

२७ मोबाईल हॅन्डसेट पर्वती दर्शन व दत्तवाडी या भागातील चोरले असल्याचे उघड.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : गुन्हे शाखा,युनिट-३ ने सराईत गुन्हेगाराकडून सोने व ३३ मोबाईल असे २ लाख रुपये पेक्षा जास्त किंमत हस्तगत करत चांगली कामगिरी केली आहे.
गुन्हे शाखा युनिट-३ चे पथक वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस हवालदार संतोष क्षिरसागर यांना,
मिळालेल्या बातमी वरुन सिंहगड रोडवरील ज्वेलर्सचे दुकानावर दरोडा टाकण्याचे तयारीत असलेले साहिल दिलीप सांबरे , सुरज रविंद्र जाबरे वय-२१ ,सोमेश्वर भानुदास गायकवाड वय-२०,
कृष्णा कुमार चव्हाण वय-१९ यांना अटक करून त्यांच्या सोबत एक विधीसंघर्षीत बालक यास ताब्यात घेवुन त्यांच्या विरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात दरोड्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला.
त्या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कस्टडी दिली. कस्टडीची रिमांड घेऊन त्यांच्याकडून एका घरफोडी चोरीच्या गुन्हयातील १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने,
तसेच १ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे वेग-वेगळ्या कंपनीचे एकूण ३३ मोबाईल हॅन्डसेट हस्तगत करण्यात आले आहेत.
दत्तवाडी पोलीस ठाणेकडील १ घरफोडीचे ६ मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित २७ मोबाईल हॅन्डसेट हे पर्वती दर्शन व दत्तवाडी या भागातील चोरलेले असून तक्रारदारांचा शोध चालू आहे.