पुण्यातील मंडईतील प्यासा हॉटेलवर पोलिसांचा छापा,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुण्यातील मध्य वस्तीतील प्रसिद्ध असणाऱ्या ‘प्यासा’ हॉटेलवर बेकायदा दारु विक्री व हुक्का पार्लरवर पोलीस उपायुक्तांनी विशेष पथकाच्या माध्यमातून बुधवारी मध्यरात्री कारवाई केली. थेट पोलीस उपाायुक्ताांनी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

creat a new website 9999 ₹Digital visiting cardcreat a new website 4999 ₹

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपायुक्तांच्या दुसऱ्या मोठ्या कारवाईने मात्र शहरात वेगळीच चर्चा सुरू आहे. यात १ लाखांपेक्षा जास्त माल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी मनोज शेट्टी याच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक अजितकुमार पाटील यांनी तक्रार दिली आहे.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री ११ नंतर निर्बंध आहेत. मात्र त्यानंतर प्यासा हॉटेलवर हुक्का पार्लर आणि मद्य विक्री केली जात होती. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती.

Advertisement

त्यानंतर पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी मध्यरात्री विशेष पथक घेऊन जात याठिकाणी छापेमारी करत कारवाई केली.

यावेळी बार व्यतिरिक्त रोडलगत वेगळे काउंटर लावत विनापरवाना मद्यविक्री करण्यात येत होती. तर अवैधरित्या हुक्का पार्लर देखील दणक्यात सुरू होते.

खडकच्या हद्दीत उपायुक्तांची दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. खडकच्या हद्दीत आज ही बर्याच ठिकाणी अवैध धंदे सुरू आहे. यावरही कारवाईची मागणी होत आहे.

Advertisement
Advertisement
Share Now