सार्वजनिक ठिकाणी खेळत असलेल्या अवैध मटका-जुगार धंद्यावर पोलिसांचा छापा,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्यावर बंदी घातली असली तरी आज राजरोसपणे अवैध धंद्याच्या सुटसुळाट झाला आहे.तर अवैध धंद्यावर पुणे पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.

चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालत असलेल्या मटका-जुगारावर कारवाई करण्यात आली आहे.चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फ्रेन्डस अॅटो वर्कच्या रोहन निलय सोसायटी समोर सांगवी येथील मोकळया जागेत पत्र्याचेशेड मध्ये काही इसम मटका जुगार खेळत आहे.

अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी बातमीचे अनुषंगाने सदर ठिकाणी छापा टाकुन कारवाई करणेबाबतचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा यांना दिले होते.

चव्हाण यांनी फ्रेंन्डस ऑटो वर्कच्या पाठीमागे रोहन निलय सोसायटी समोर, स्पायसर रोड, सांगवी येथे जावुन
मोकळया जागेतील पत्र्याचे शेड मध्ये मटका जुगार खेळत असलेल्या ठिकाणी छापा टाकला असता २२ हजार ६२०रोख

रक्कम व जुगाराचे साहित्य सह माल जप्त करुन जुगार घेणारे व खेळणारे असे ७ जणांना मटका जुगार चालविणारा मालक असे एकुण ८ इसमांविरुध्द चतुःशृंगी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलीस सह
आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे,अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे,श्रीनिवास घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली शिल्पा चव्हाण, जुबेर मुजावर,सहा.पोलीस निरीक्षक,दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१,गुन्हे शाखा यांचे पथकाने केली आहे.

Advertisement
Share Now