कोंढव्यातील क्लब 24 हुक्का बारवर पोलीसांचा छापा,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

(Club 24 hookah bar) ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

(Club 24 hookah bar) पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

अवैधरित्या हुक्का पार्लर ठिकठिकाणी सध्या जोरात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

तर त्याला लगाम घालण्यासाठी पोलीस दिवसरात्र एक करत आहेत.

कोंढवा येथील एका हॉटेलमध्ये अवैधरित्या चालु असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेने ( Crime branch pune) छापा घातला आहे.

काल रविवारी (२५) दोराबजी महंमदवाडी रोड येथे हॉटेल क्लब २४ वर अवैधरित्या हुक्का बार चालु असल्याची माहिती मिळाली होती.

वाचा : वाचा : ४ लाख किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन विक्री करणाऱ्या नायजेरियन तरुणाला अटक,

बातमीची खातरजमा करण्याकरीता शिल्पा चव्हाण पोलीस निरीक्षक सामाजिक सुरक्षा विभाग,

यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांची विविध पथके स्थापन केली.

व सदरील हॉटेलवर अचानक पणे छापा टाकला असता हॉटेलचा मालक अमर खंडेराव लटुरे, रा. महंमदवाडी,पुणे

व हॉटेल मॅनेजर विक्रम सुखदेव जाधव,वय-३० वर्षे ,रा.महंमदवाडी,पुणे हा सदर हॉटेल मध्ये बेकायदेशीर पणे हुक्का बार चालवुन ग्राहकांना हुक्का सेवन करण्याकरीता पुरवीत असताना मिळुन आला आहे.

त्यांनी कोवीड-१९ विषाणु संसर्गाचे उल्लंघन केल्याने वरील हॉटेल चालक व मॅनेजर यांचे विरुध्द सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ कलम ४ अ,२१ अ,

तसेच भादवि कलम १८८,२६९,२७० तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा कलम २००५ चे कलम ७ (२),२०(२) अन्वये कोंढवा पोलीस ठाण्यात

( kondwa Police Station Pune ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा : मैत्रिणीवर बलात्कार करून व्हिडिओ वायरल करणा-या नराधमास अटक

तर अवैद्य रित्या चालविणारे हुक्का पार्लर हे सील करून ४ चिलीम आणि इतर साहित्य असा एकुण ३५ हजार ६०० रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त,डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त‌ अशोक मोराळे,

गुन्हे शाखा,पोलीस उप-आयुक्त श्रीनिवास घाडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण ,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांडेकर,अंमली पदार्थ विरोधी पथक-२,गुन्हे शाखा यांनी केली आहे.

Advertisement
Share Now