महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्याला पोलीसांनी केली अटक,

ebook.trendingstudysajagnagrikktimes.sajag-advertisement-offer
Advertisement

हैद्राबाद येथुन पोलिसांनी घेतले ताब्यात.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : शेजारच्या महिलेशी ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व त्याची नजर चुकवून अश्लील फोटे काढून लाखोंची खंडणी मागणाऱ्याला पोलीसांनी हैद्राबाद येथून ताब्यात घेतले आहे.

हकीकत अशी की आरोपी हंसराज बाबु गायकवाड वय ३१ वर्षे रा हनुमान मंदिराजवळ किस्टापुर मेडचाळ रोड हैद्राबाद, मुळ – मु सावरखेड पो डुंगराळा ता. नायगाव जि नांदेड व फिर्यादी महिला हे ३ वर्षापुर्वी शेजारी राहण्यास होते.

त्यामुळे त्यांच्यात एकमेकांच्या ओळखीतुन प्रेम संबंध निर्माण झाले.आरोपीने काही अश्लिल फोटो फिर्यादी यांचे संमती शिवाय काढुन स्वतःच्या मोबाईल मध्ये जतन करुन ठेवले होते.

त्या फोटोचा वापर करुन तो गेल्या एक महीन्यापासुन महिलेला दोन लाख एवढी रक्कम दया, नाहीतर सदरचे फोटो तुमच्या नातेवाईकांना व मित्रपरीवाराला फॉरवर्ड करतो.

अशी धमकी देत होता. सदर महिलेच्या तक्रारीवरुन बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा गुन्हे शाखा युनिट-२ कडुन तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषणा वरुन दाखल गुन्हयातील आरोपी गायकवाड हा हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट-२

कडील पथक हैद्राबाद येथे तपासकामी रवाना झाले व आरोपी हंसराज बाबु गायकवाड हा मिळुन आला.

त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता सदर आरोपीने फिर्यादी महिलेला ब्लॅकमेल केल्याचे कबुल केले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ मार्च पर्यंत पोलीस कस्टडी आली आहे.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त, श्रीनिवास घाडगे, सहा. पो. आयुक्त सुरेद्रं देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, महेंद्र जगताप, गुन्हे सहा पोलीस निरिक्षक वैशाली भोसले,पोलीस उप-निरीक्षक, आनंदराव पिंगळे,

पोलीस हवालदार संजय जाधव, अस्लम पठाण, किशोर वग्गु, उत्तम तारु, गजानन सोनुने,समिर पटेल, मितेश चोरमोले, निखिल जाधव, अरुणा शिंदे यांनी केली आहे.

Advertisement
Share Now