तलवारीने केक कापून बर्थडे साजरा करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

स्टेटस व्हॉटसअपला ठेवून दहशत निर्माण केली होती.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : सध्या वाढदिवस साजरा करताना रस्त्यावर येऊन आणि हातात हत्यारे घेऊन केक कापणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेकायदेशीररित्या हत्यारे आणून रस्त्यावर केक कापणा-यांचे पोलीस आता मुसक्या आवळत आहेत.

दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे यांनी दतवाडी तपास पथकाला हद्दीतील झोपडपट्टया इतर वसाहतीतील उपद्रवी युवक व गुन्हेगार यांच्या व्हॉटसअप व इतर सोशल मिडिया ग्रुपवर येणा-या गुन्हेगारी कृत्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते.

६ ऑगस्ट रोजी दत्तवाडी पोलीस ठाणयाकडील पोलीस अमंलदार विष्णु सुतार,शरद राऊत व राहुल ओलेकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली “काही दिवसांपूर्वी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करून त्यांचे फोटो व्हॉटसअप स्टेटस ला ठेवून दहशत निर्माण करणारे दोन युवक हे राम मंदिरा जवळ, जनता वसाहत येथे हातामध्ये हत्यारे घेवून थांबलेले आहेत.

सदर माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील लोहार व तपास पथक कर्मचाऱ्यांनी सापळा रचुन १) रितेश बाळु पायके वय १९ वर्षे, धंदा काही नाही रा.गल्ली नं. ७४, जनता वसाहत, राम मंदिराजवळ, २) आदित्य संजय नलावडे वय १९ वर्षे, धंदा काही नाही, रा. गल्ली नं. ७७,जनता वसाहत, राम मंदिराजवळ, यांना हत्यारांसह पकडले आहे.

त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचेकडील तलवारी त्यांचे ओळखीच्या भोर मधील लोहार प्रेम योगेश पवार वय २४ वर्षे, धंदा लोहार
व्यवसाय, रा. नवीआळी झोपडपट्टी, भोर, यांचेकडुन घेतल्याचे सांगितल्याने व तो लोहार सद्या त्यांना अजुन हत्यारे देण्यासाठी जनता वसाहत परीसरात आल्याचे सांगितले.

त्यानुसार लागलीच कारवाई करुन पोलीसांनी हत्यारे बनविणा-या लोहारास सुध्दा अटक केली आहे. सदर तीन्ही जणांना अटक करुन त्यांचेविरुध्द दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक प्रमोद खरात हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचेमार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक रवप्नील लोहार, कुंदन शिंदे,

राजू जाधव,शिवाजी क्षीरसागर, नवनाथ भोसले, अमित सुर्वे, विष्णु सुतार, शरद राऊत, राहुल ओलेकर, भरत आस्मर, अक्षयकुमार
वाबळे, प्रमोद भोसले यांनी केली आहे.

Advertisement
Share Now