कोंढव्यातून चोरी गेलेला अंड्याने भरलेला ट्रक पोलिसांना सापडला,

sajagnagrikktimes.sajag-advertisement-offerebook.trendingstudy
Advertisement

मालासहीत ३ टेम्पो चोरणा-यास अटक करुन जप्त केला लाखोचा ऐवज.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन सुमारे ७ दिवसापुर्वी कोबंड्याचे अंडयाने भरलेला चार चाकी टेम्पो चोरीस गेलेला होता. तसेच त्यापुर्वी देखील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन टेम्पो चोरीस गेलेले होते.

युनिट-०५,गुन्हे शाखेकडुन त्या टेम्पोचा शोध घेत असताना पोलीस हवालदार आश्रुबा मोराळे, चेतन चव्हाण, गायकवाड यांनी १० कि.मी. चे आजुबाजुचे सी.सी.टि.व्ही. कॅमेरे ( CCTV camera) चेक केले.

सदर कॅमरे चेक केल्या नंतर जावेद रफीक खान,वय-३८ वर्षे रा.स.नं.४२, भानाल्ला बिल्डींग,कोंढवा याने टेम्पो चोरल्याची खात्री झाल्याने त्यास सापळा रचुन गोकुळनगर बस स्टॉप, कोंढवा पुणे येथे ताब्यात घेण्यात आले.

त्याचेकडे पोलिसांनी तपास केला असता त्याने आणखीन वर्मोवा,(मुंबई) व कोंढवा येथुन असे अजुन २ टेम्पो चोरल्याचे व कोंढवा पिसोळी येथील मोबाईलचे दुकान फोडल्याचे तसेच पिकअप जिपच्या स्टेपण्या चोरल्याची कबुल दिली आहे.

जावेद खान याचेकडुन घरफोडीचा १ व वाहनचोरीचे ३ असे एकुण ४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.१) एक टाटा एस कंपनीचा चाकी टेम्पो व त्यामधील अंडी,२) पिकअफ जिप च्या सात स्टेपन्या, ३) एक टाटा कंपनीचा ए.सी.ई ई.एक्स मॉडेलचा चार चाकी टेम्पो ४) एक थ्री व्हिलर पॅगो टेम्पो, ५) चोरीचे मोबाईल फोन व ऍक्सेसिरीज असा मिळुन ११ लाख ५० हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,सह पोलीस आयुक्त, डॉ.रविंद्र शिसवे , श्रीनिवास घाडगे सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उप-निरीक्षक सोमनाथ शेंडगे,

पोलीस अमंलदार रमेश साबळे, दया शेगर, चेतन चव्हाण, आश्रुबा मोराळे, विनोद शिवले, अकबर शेख, पृथ्वीराज पांडोळे, महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर, विशाल भिलारे, प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, अजय गायकवाड, दत्ता ठोंबरे, अमर उगले, दिपक लांडगे, संजयकुमार दळवी, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांनी केलेली आहे.

Advertisement
Share Now